देशाच्या राजकारणात बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यानंतर देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे XXX लोक नाहीसे होतील. अशी शेलक्या शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मागील काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली.