उर्फी जावेद प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पुन्हा एकदा जाब विचारला आहे. यावेळी त्यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप नोंदवला. मला नोटीस पाठवताना आयोगाच्या सदस्यांची मंजुरी घेतली का? असा प्रतिप्रश्नही चित्रा वाघ यांनी केला आहे.