'राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की औरंगजेब क्रूर नाही. ज्या औरंगजेबाने संभाजी राजांना हालहाल करून मारलं तो औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रूर नाही? राष्ट्रवादी पक्षाचे हे सगळं ठरवून चाललेलं आहे. या भूमीत उदो उदो हा फक्त संभाजी राजे आणि शिवरायांचा होईल हे राष्ट्रवादीने लक्षात ठेवावं', अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार राम कदम यांनी दिली आहे. यासोबतच 'जे औरंगजेबांचा उदो उदो करतात त्यांच्यासोबत आणखी किती काळ राहावं' असा उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.