यावर्षी ज्या मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस आणि ओटीटी गाजवले त्या सिनेमांच्या यादीत 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे'चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा सिनेमा प्रेक्षकांनी तितक्याच आवडीने पाहिला. दरम्यान अलीकडेच या सिनेमाचा वर्षपूर्ती कार्यक्रम पार पाडला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत याठिकाणी धर्मवीरच्या शूटिंगला सुरुवात झालेली. यानिमित्त सिनेमाचे निर्माते मंगेश देसाईंनी वर्षपूर्ती सोहळ्याचे काही फोटो शेअर करत मोठी घोषणा केली आहे.कोलशेतमध्ये जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा वर्षपूर्ती सोहळा पार पडलाा. यावेळी देसाईंसह आनंद दिघेंची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक आणि सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. दरम्यान धर्मवीर सिनेमाच्या शेवटीही असे दाखवण्यात आले होते की दिघेंची कहाणी एका भागात संपणारी नाही आहे, अर्थात सिनेमाचा दुसरा भागही येणार अशी खात्री प्रेक्षकांना होती. आता मंगेश देसाईंनी याविषयी अधिकृत घोषणा केली आहे.
#anildeshmukh #bombayhighcourt #eknathshinde #devendrafadnavis #basavarajbommai #karnataka #narendramodi #Hirabenmodi #ahemdabad #hwnewsmarathi