नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु असून आज या अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. काल सीमावादावर विधिमंडळात ठराव मंजूर झाल्यानंतर आज पुन्हा विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक झाले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी काल रवी भवनबाहेर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांशी असभ्य वर्तन करून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विरोधकांनी सभात्याग का केला याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे.
#NitinDeshmukh #BhaskarJadhav #ShivSena #WinterSession #UddhavThackeray #MaharashtraAssembly #Maharashtra #Nagpur #Vidhansabha #HWNews