महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक- 24 मधील शेत जमिनीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने शंभूराज देसाई यांच्यावर केला आहे. या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#ShambhurajDesai #AnilParab #UddhavThackeray #Maharashtra #Karnataka #BorderDispute #Belgaum #EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena