आज जालना शहरात जालना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर जालना विधानसभेचे आमदार कैलास गोरंट्याल पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली. तुम्ही स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आहात. काहीतरी भेटावं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली. उद्धव ठाकरेंना धोका देऊन ते नफ्यासाठी गेले, असे गोरंट्याल म्हणाले.