"महाराष्ट्रातल्या राजकारण्यांवर केल्या जाणाऱ्या घोटाळ्यांच्या आरोपाच्या यादीत अजून एक भर पडलीये. गेल्या काही दिवसांपासून NIT भूखंड घोटाळा प्रकरणाने राज्याचे हिवाळी अधिवेशन गाजतंय. या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडी एकजूट झाल्याचे दिसतेय. घोटाळ्याचा आरोप पण कुणावर तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर. घोटाळा कुठला: तर नागपूर भूखंडाचा आणि त्यातहि विरोधकांच्या मते घोटाळ्याची किंमतही तशी मोठीच आहे. १०० कोटी. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ६ महिनेही झाले नाहीत आणि इतक्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागलेत. त्यामुळे एकनाथ शिंदे विरोधकांच्या कात्रीत सापडलेत. बरं विरोधकांनी आरोप तर केलेच आहेत पण शिंदे ज्यांच्यासोबत सत्तेत आहेत त्या भाजपच्या काही आमदारांनीसुद्धा NIT भूखंड घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चोकशी व्हावी यासाठी प्रयत्न केल्याची बातमी आता समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या आमदारांनी अगदी दीड महिने आधीपासूनच हि फिल्डिन्ग लावायला सुरुवात केली होती, असेही या बातमीमधून समोर येतेय.
त्यामुळे, ज्या भाजपवर विश्वास ठेवून एकनाथ शिंदेनी ठाकरेंविरोधात बंड केलं, तीच भाजप शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करणार का? असा सवाल विचारला जातोय.
हे प्रकरण नक्की काय आहे त्याची माहिती आमच्या सहाय्यक संपादक, आरती घारगी देत आहेत.
#EknathShinde #NITLandScam #NagpurImprovementTrust #BJP #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #Shivsena #Maharashtra #NIT #WinterSession #Parliament #Nagpur #VidhanSabha #Shivsena #HWNews