मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. एनआयटी भूखंड घोटाळ्यावरुन ठाकरे गटाचे आमदार अनिल परब विधानपरिषदेत आक्रमक झालेले दिसले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल बाजू मांडली पण चर्चेला विरोध केल्याचा मुद्दा परबांनी मांडला. त्यानंतर अनिल परबांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. चर्चेला परवानगी नसली तरी परब बोलत असल्यानं विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांनी काही वेळ गोंधळ घातल्याचं दिसलं