"गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीची धुमश्चक्री संपून आता एक आठवडा झाला आहे. पण महाराष्ट्रात मात्र अजून एका निवडणुकीची रणधुमाळी चालूच आहे. १८ डिसेम्बरला महाराष्ट्रात ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळेच राज्यातल्या सर्वच पक्षांनी गावोगावी प्रचाराचा सपाटा लावलाय. साधारणपणे राज्याचे बडे नेते, त्यांचे राजकारण यावर सर्वांचे लक्ष असत, पण आता ग्रामपंचायत निवडणुकीतही जोरदार राजकारण रंगणार आहे.
या निवडणुकीत अनेक बड्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागलीये. त्यामुळेच काही जिल्ह्यांत अगदी राज्य पातळीवरचे नेत्यांकडून प्रचार करवण्यात येत आहे.
त्यापैकीच एक म्हणजे कोल्ह्हापूर आणि त्यातही सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण. या ग्रामपंच्यात निवडणुकीत कोल्हापूरच्या राजकारणातले कडवे विरोधक सतेज पाटील आणि धनंजय महाडिक पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. आमच्या Associate Editor Arti Ghargi यांचे सविस्तर विश्लेषण.
#SatejPatil #DhananjayMahadik #GrampanchayatElection2022 #BuntyPatilvsMunnaMahadik #BuntyPatil #Mahadik #Kolhapur #South #Solapur #RuturajPatil #CongressVsBJP #GrampanchayatElection