एकनाथ खडसेंना ज्या पक्षाने मोठा केलं त्या पक्षाशीदेखील ते एकनिष्ठ राहू शकले नाही आणि ते आमच्यावर खोक्याचे आरोप करतात, असा टोला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. आज (१० डिसेंबर) जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या गुलाबराव पाटलांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना खडसे यांनी जळगावचे तूप १५ रुपये किलो दराने साताऱ्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेऊन दूध संघाचा विकास केला, अशी खोचक टीका केली.
दूध संघामध्ये गेल्या काही वर्षांपासून तूप-लोणी या संदर्भातील मोठा भ्रष्टाचार झाला. ७५ रुपये किलोप्रमाणे तूप विकण्यात आले. ही सर्व परिस्थिती पाहता आम्ही पहिल्यांदाच या मतदान प्रक्रियेत सहभाग घेत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.