पुण्यातील रिक्षाचालकांनी आज पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील राज महाल येथे आंदोलकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. एका पदाधिकाऱ्याने यापूर्वी तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत असं सांगत आमचीही मदत करावी असं गाऱ्हाणं घातलं. यावर राज यांनी आपल्या आसनावरुन उठता उठता, “आम्ही फक्त प्रश्न सोडवायलाच असतो,” असं म्हटलं. राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया ऐकून उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.