ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. याचवेळी त्यांची प्रकृती ढासळत होती. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.