काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं. त्यात आता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राची थेट शिवाजी महाराजांच्या अफजल खान भेटीशी तुलना केली.आशिष शेलार यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. शेलार पुढं म्हणाले की, राहुल गांधी यांनी नेहरूजींना वाचलं नाही. इंदिराजींचा अभ्यास केला नाही. केरळमधून निवडून आल्यानंतर केवळ हिरव्या झेंड्याचा अभ्यास केलेला दिसत आहे. राहुल यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. तसेच उद्धव ठाकरे यांनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सत्तेसाठी माती खाल्ली, असंही शेलार म्हणाले.
#UddhavThackeray #AshishShelar #RahulGandhi #BharatJodoYatra #Congress #Swantraveer #Savarkar #MaharashtraPolitics #2022 #HWNewsMarathi