राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हर हर महादेव चित्रपट वाद मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज आव्हाडांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला सुनावलं आहे.