राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे माध्यमांशी बोलताना केला. कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
#PrithvirajChavan #AjitPawar #DevendraFadnavis #BJP #MVA #Shivsena #EknathShinde #HWNewsMarathi