मनसेतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ ऑक्टोबर रोजी हजेरी लावली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते. दरम्यान, हे तिन्ही नेते एकत्र आल्यानंतर आगामी काळात महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास येणार का? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील १० वर्षांपासून शिवाजी पार्कवर रोषणाई होते, त्यात काहीही नवे नाही, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.
#KishoriPednekar #EknathShinde #RajThackeray #DevendraFadnavis #MNS #BJP #ShivSena #Diwali2022 #Deepotsav #ShivajiPark #Dadar #Mumbai #Maharashtra