राज्यात सध्या जोरदार परतीचा पाऊस बरसत आहे. याच परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस या पिकाला परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. मात्र राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादात शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे.