शिवसेनेच निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. आगामी पोटनिवडणूकीत आता दोन्ही गटांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाशिवाय लढवावी लागणार आहे. यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे आणि शिंदे दोघांवरही निशाणा साधला.