मुंबई अंधेरीची पोटनिवडणूक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष आणि चिन्हांबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलाच टोमणा लगावला.