एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच पंकजा मुंडे यांचा भगवान भक्ती गडावरचा मेळावा चांगलंच चर्चेत आला. भाषणात पंकजा मुडेंनी आपण नाराज नाही असं जरी सांगितलं असलं तर अप्रत्यक्षपणे त्यांनी पक्षाला चांगलंच सुनावलं आहे. मात्र पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर भगवान भाकरी गडावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली कि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.