अजित पवारांच्या कामाची आणि शिस्तीची ज्या प्रमाणे चर्चा होते. त्याच प्रमाणे त्यांच्या हजरजबाब पणाचीही होते. यापूर्वी अनेकदा अजित पवारांना आपण कार्यकर्तांना मार्गदर्शन आणि काम न झाल्यास रागावताना पाहिले आहे. मात्र, कधी गाणं गुणगुणतांना ऐकलेले नाही. मात्र, आता अजित पवारांना गाणं गुणगुणतांना पाहण्याचीदेखील या एका घटनेनं पूर्ण झाली आहे. उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात चक्क अजित पवारांनी गाण्याच्या दोन ओळी गुणगुणल्या अन् कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत याला जोरदार दादही दिली.