पुण्यातील नवरात्रौ महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात घटस्थापनेच्या मुहूर्ता निमित्त देवीचा जागर करण्यात आला. तसेच विविध कला गुणांनी भरलेल्या या कार्यक्रमात मराठी अभिनेत्रींनी नृत्य आविष्कार सादर केले.