मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान औरंगाबाद येथील कार्यक्रम केवळ 15 मिनिटांत आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबाद येथील कार्यक्रमाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.