जेव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावालाही सोडलं नाही हे शब्द आहेत मनसे नेते संदीप देशपांडे यांचे. महाराष्ट्रातल्या पुण्यानजीकच्या तळेगावात येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठं काहूर माजलंय. विरोधक आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात. अशातच दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही आज शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं. त्याला मनसे नेते संदीप देशपांडेंनी आपल्या भाषेत सडेतोड उत्तर दिलंय. आता सामनात नेमकं काय म्हटलंय? आणि त्यावर देशपांडेंचं उत्तर काय? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.