दुसऱ्या दिवसाची दुपार आली तरी पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक संपण्याची चिन्हं दिसेनात.लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, शास्त्री रस्ता इथे मंडळांच्या रांगा लागल्या आहेत
आताची स्थिती पाहता विसर्जन मिरवणूक संपायला संध्याकाळ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.२ वर्षांनी निर्बंधमुक्त मिरवणुका झाल्यानं यंदा विसर्जन मिरवणूक लांबली.मिरवणूक आवरती घेण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि भाविकांचा उत्साहही ओसंडून वाहताना दिसून आला.