राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालं, या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. पण या मंत्रिमंडळ विस्तारात दिलेली काही खाती चुकीच्या हातात दिल्याची सध्या चर्चा सुरु आहे. कारण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं एक स्टेटमेंट, ज्यात त्यांनी हापकीन या माणसाकडून औषध घेणं बंद करा असं म्हंटल्याचं बोललं जातंय.