शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे सालस नेतृत्व राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभले होते. मात्र काही लोकांना दुर्बुद्धी आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून बाजूला व्हावं लागलं. असं असलं तरी त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही नगण्य असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षरित्या केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यकाळात केलेल्या कार्याची दखल देशाने घेतली आहे. त्यामुळे यापुढे देशाला त्यांचं नेतृत्वाच स्पर्श व्हावं व देशात हिंदुत्वाचा झंझावात येऊ दे असे म्हणत दानवे यांनी उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं असे म्हटले आहे.
#AmbadasDanve #Aurangabad #Shivsena #BJP #UddhavThackeray #HWNews