उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता.उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवरुन एकनाथ शिंदेंनी पलटवार लगावला. हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, ‘महाराष्ट्राच्या विकासाचं, जनतेचे अश्रू पुसण्याचं, बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचं मी कंत्राट घेतलं आहे’ असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.