राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांची नोटीस पाठवली आहे. औरंगाबादमधील १ मेच्या सभेत अटींचा भंग केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करताना राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस
पाठवण्यात आलीय. औरंगाबाद पोलिसांनी स्पीड पोस्टानं ही नोटीस पाठवलीय.