येत्या 'वर्षभरात ७५ हजार शासकीय रिक्त पदांची भरती करणार' असल्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केलेय. एमपीएससीतर्फे आकृतीबंधानुसार ही पदं भरण्यात येतील. तसंच जिल्हा निवड समित्यांमार्फत भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ५० टक्के पदंही भरण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय.