कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास व्यक्तीची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली होती. पुढच्या काही तासांत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करुन उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देतील, असं वृत्त होतं. पण या वृत्तावर खुलासा करुन राजन साळवे यांनी सगळ्या चर्चांवर पडदा पाडला आहे. ठाकरेंसोबत राहणार की शिंदेंकडे जाणार? या प्रश्नाचं उघड उघड आणि 'रोखठोक' उत्तर देत आपल्या विरोधकांचा त्यांनी तिखट समाचार घेतला आहे.
#RajanSalvi #Rajapur #Kokan #Shivsena #BJP #uddhavThackeray #EknathShinde #MLA #HWNews