भाजपचे नेते मोहित कंबोज हे सक्रीय झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याबाबत सूचक ट्विट करत लवकरच राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या एका जुन्या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासह राष्ट्रवादीचा हा बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटायला जाईल, असा मोठा दावाही करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांनी लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण असेल, नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत
#MohitKamboj #SharadPawar #AjitPawar #Tweet #IrrigationScam #EknathShinde #AmolMitkari #NCP #Maharashtra #MonsoonSession #HWNews