‘राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता तुरुंगात जाणार’ असा दावा करत भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केले. मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. कंबोज यांना ईडी कार्यालयातील माहिती कशी मिळते असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या कार्यालयातून चालतात का? कोणावर कारवाई होणार हे भाजप नेत्यांना आधीच कसे कळते? भाजपचे नेते आधी ट्विट करतात मग त्या नेत्यावर कारवाई होते. ईडी कार्यालयातील माहिती भाजप नेत्यांना आधी कशी मिळते, असा सवाल शिवसेनेच्या विधानपरिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे.
#ManisaKayande #MohitKambojTweet #MaharashtraAssembly #Politics #NCP #RashtravadiCongress #ED #CBI #BJP #IrrigationScam #MaharashtraMonsoonSession #HWNews