'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं नवं पर्व १५ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. या कार्यक्रमामधील प्रसिद्ध कलाकार गौरव मोरे आणि निखिल बने यांची यानिमित्त भेट झाली. लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना गौरव आणि निखिलने त्यांचा चाळीमधील प्रवास आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्राने' या कार्यक्रमाने दिलेलं प्रेम याबाबत सांगितलं.