संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांच्याकडून काल (१२ ऑगस्ट) एक ट्विट पोस्ट झालं. त्या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा ‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख’ असा उल्लेख केला होता. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरू होती. अशातच टि्वटसोबत त्यांनी विधानसभेतील उद्धव ठाकरेंचं एक भाषणही जोडलं होतं. पण काही मिनिटांतच त्यांनी ते ट्वीट डिलीटही केलं. त्यामुळे शिरसाट दबावतंत्र वापरत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत या ट्विटबाबत खुलासा केला आहे.“मी दबावतंत्र कधी वापरलं नाही, कधी तसे करणार नाही. काल टेक्निकल प्रॉब्लेममुळे ट्विट पोस्ट झालं. ते ट्विट मार्च महिन्यातलं होत आणि चुकून पोस्ट झालं. माझ्या लक्षात आल्यानंतर लगेच डिलीट केलं. असा खुलासा करत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी ट्विटचा खुलासा केला आहे.
#SanjayShirsat #EknathShinde #Shivsena #Maharashtra #CabinetExpansion #BJP #DevendraFadnavis #SharadPawar #HWNews