शिवसेना नेते खासदार संजय राउत यांना पत्रा चाळ प्रकरणी ईडीने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळीचं ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. आणि ९ तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं. ज्यानंतर पुण्यात दांडेकर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. 'भाजप हमसे डरती है ED को आगे करती है' अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी लगावल्या.