देशात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस मिळणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुढील ७५ दिवसांसाठी कोविड लस अमृत महोत्सव राबवला जाणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सरकारी केंद्रांवर मोफत बूस्टर डोस दिला जाईल.. या सुरक्षा कवचामुळे भारत आरोग्यदायी बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय...