कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारनं आता बूस्टर डोस लसीकरणावर भर देण्याचं ठरवलंय.
त्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यात कोरोना प्रतिबंधक तयारीचा तपशील जाणून घेतला.
देशातील आरोग्य यंत्रणा भक्कम ठेवण्यासाठी आता डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा बूस्टर डोस दिला जातोय.
शिवाय, वयोवृद्ध आणि गंभीर आजार असणाऱ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून आज देशभरात ६० वर्षांवरील वृद्धांना आणि गंभीर आजार असणाऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधक लशीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस दिला जातोय.
#corona #coronanews #boosterdose #vaccination #vaccine