Guru Purnima 2022 : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईनगरी भक्तांनी गजबजली ABP Majha

ABP Majha 2022-07-13

Views 35

गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा.... समस्त गुरुंना अभिवादन करण्याचा आजचा दिवस... अर्थात गुरुपौर्णिमा.... साईनगरी शिर्डी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांनी गजबजलीय. साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमलीय... गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्याने लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.. शेकडो पालख्याही पायी शिर्डीत पोहोचल्यात. काकड आरतीनंतर साईंचं मंगलस्नान पार पडलं. त्यानंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट तसंच विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS