शिर्डीतल्या साई संस्थाननं कोरोनाकाळात फुलं, प्रसादावर घातलेली बंदी अद्यापही कायम ठेवलेली आहे.. मात्र दुसरीकडे शेगावचं संत गजानन महाराज मंदिर, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, मुंबईचा सिद्धीविनायक यासारख्या अनेक मोठ्या मंदिर संस्थानांनी कोरोना आटोक्यात येताच ही बंदी उठवली. या मंदिरात फुलांचं, प्रसादाचं, मंदिराच्या स्वच्छतेचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सुरू आहे... त्यामुळे या सर्व मंदिरांना हे जमत असेल तर शिर्डी संस्थानलाच फुलांचं प्रसादाचं वावडं का हा प्रश्न विचारला जातो.