शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडाचे परिणाम पुणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावरही दिसणार आहेत. शिंदे यांच्या बंडामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होणारा त्रास हे प्रमुख कारण दिलं जातंय. तेच कारण पुणे जिल्ह्यातही पुढे येण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे दोन दिग्गज नेते राष्ट्रवादीमुळे खिळखिळे झालेत. शिंदेंच्या बंडामुळे त्यांनाही संधी निर्माण झालीए. सध्याची पुणे जिल्ह्याची राजकीय स्थिती पाहता ग्रामीण भागात आणि शहरात शिवसेनेचा एकही आमदार नाही. पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचं स्थान निश्चितच भक्कम आहे