एकनाथ शिंदेंचं बंड हे शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड का म्हटलं जातंय? | Sakal Media
विधानपरिषदेचा निकाल लागला आणि शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २, काँग्रेसचा १ तर भाजपचे पाचही आमदार निवडून आले. त्यामुळे राज्यात एकीकडे भाजपात जल्लोषाचं वातावरण असताना शिवसेनेत मात्र मोठा भूकंप झालाय. कारण शिवसेनेचे एकनिष्ठ, उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत, दिवंगत नेते आनंद दिघेंना गुरु मानणारे, ठाण्यातला शिवसेनेचा बालेकिल्ला कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड पुकारलंय. पण एकनाथ शिंदेंआधीही शिवसेनेनं ३ महत्वाची बंड पाहिली आहेत. ती कोणती जाणून घेऊयात या व्हिडीओतून-