शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. आता राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची 'सिल्व्हर ओक'वर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली.
#JayantPatil #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Hindutva #MaharashtraPolitics #Maharashtra #NCP #HWNews