गेल्या शुक्रवारी नमाजानंतर देशभरात झालेलं आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुढच्या शुक्रवारी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाराष्ट्र सायबर सेल सतर्क झालाय. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि ज्ञानवापी मशिदीचा वाद यावरून वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहेत.