सायबर हल्ला करून खरंच पॉवर ग्रीड फेल होऊ शकते का?
गेल्या १२ ऑक्टोबर २०२० ला मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागात सकाळीच वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, आता जवळपास पाच महिन्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सने एक वृत्त दिले आहे. मुंबईतील ब्लॅकआऊट ही तांत्रिक बाब नसून याला चीन केलेला सायबर हल्ला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. मात्र, असा सायबर हल्ला करून खरंच पॉवर ग्रीड फेल होऊ शकते का?