पर्यावरण दिनाचे औचित्य साधत (World environment day 2022) राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad ) यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन केले. तब्बल 350 कोटी रुपये खर्च करून 390 झाडांची कत्तल करत कोपरी उड्डाणपुलाच्या (Kopri flyover) निर्मितीचा घाट घातला जातोय याला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तीव्र विरोध दर्शविलाय. मात्र भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh naik )यांनी देखील आजच लॉंग मार्च काढत चिपको आंदोलन केल्याने जितेंद्र आव्हाडांनी नाईकांवर जोरदार टीका केली. 2008 साली या उड्डाणपुलाचा ठराव यांनीच केला होता त्यामुळे नवी मुंबईच्या जनतेची यांनी माफी मागावी असा आरोप आव्हाडांनी केलाय.