संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या रशिया- युक्रेन युद्धाला १०० दिवस पूर्ण झालेत. या शंभर दिवसात युक्रेनच्या रस्त्यांवर पडलेले मृतदेह, लष्करी वाहने, बाँबहल्ल्यात मोडून पडलेली शहरे, नाटोशी जवळीक साधली म्हणून युक्रेनला धडा शिकविण्याचा रशियाचा निर्धार, युक्रेनकडून मदतीची कळकळीची वारंवार होणारी विनवणी आणि निष्पाप जनतेचा आक्रोश या व्यतिरिक्त वेगळे चित्र जगाला दिसलं नाही.रशिया- युक्रेन युद्धात कोणाची बाजू बरोबर, यावर सखोल चर्चा होत आहे आणि पुढेही होईल; पण या विनाशकारी युद्धामुळे सामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल झालेत. आजचा हा व्हिडिओ या रशिया - युक्रेन युद्धाच्या १०० दिवसांचा आढावा.
#russiaukrainewar #russia #ukraine #russiawar #vladimirputin #volodymyrzelensky #war #kyiv #kharkiv #america #100daysrussiaukrainewar #nato #un #usa #crudeoil #india #inflation #financialcrisis