राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयानं दखल घेतली आहे. या आरोपपत्रात तपासयंत्रणेनं मलिकांविरोधात मनी लाँड्रिंगमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी मलिकांविरोधात या गुन्ह्यात सामील असल्याचे पुरावे असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.