राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर मागील काही काळापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने टीका करताना दिसत आहेत. मागील काही आठवड्यांपासून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच रविवारी नाशिकमध्ये बोलताना सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचे आभार मानलेत. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं?